Wednesday, 8 March 2017

यमुनानगर रुग्णालय "बेटी बचाव बेटी पढाओ"

"जागतिक महिला दिनानिम्मित भाजपच्या वतीने महिलांच्या सन्मानासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन"

 बेटी बचाव बेटी पढाओचा नारा देत निगडीत केली जनजागृती








जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत निगडी भाजपाच्या वतीने महिलांच्या सन्मानासाठी विविध उपक्रमाचे आयोजन सेक्टर २२ येथे करण्यात आले बेटी बचाव बेटी पढाओ या देशव्यापी मोहिमेची जनजागृती करण्यात आली.

          यमुनानगर रुग्णालय येथील नवजात मुलींच्या मातांचा सन्मान

Women Day Celebration_Pimpri Chinchwad Prabhag # 13 Campaign



"जागतिक महिला दिनानिम्मित भाजपच्या वतीने महिलांच्या सन्मानासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन"

 बेटी बचाव बेटी पढाओचा नारा देत निगडीत केली जनजागृती
पिंपरी (प्रतिनिधी) दि.०८ - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत निगडी भाजपाच्या वतीने महिलांच्या सन्मानासाठी विविध उपक्रमाचे आयोजन सेक्टर २२ येथे करण्यात आले बेटी बचाव बेटी पढाओ या देशव्यापी मोहिमेची जनजागृती करण्यात आली.


 यमुनानगर रुग्णालय येथील नवजात मुलींच्या मातांचा सन्मान, महिलांसाठी हळदी कुंकु कार्यक्रम, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान, घरेलु व महिला बांधकाम कामगारांचा सन्मान, निगडी येथील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमेच्या जनजागृतीसाठी निगडी येथील अंकुश चौकात महिला व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला अशा विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

सदरच्या कार्यक्रमास नगरसेविका कमलताई घोलप, बेटी बचाव बेटी पढाओचे शहराध्यक्ष अमित गुप्ता, सामजिक कार्यकर्ते शिवाजी साळवे, भाजप अनुसुचित जाती आघाडी सरचिटणीस सचिन वाघमारे, कविता खराडे, सौरव वाघमारे, दिपक झोंबाडे, राहुल कुसाळकर, शेखर खराडे आदी प्रमुखांसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 कार्यक्रमाचे आयोजन बांधकाम कामगार सेनेचे उपाध्यक्ष व भाजप प्रभाग अध्यक्ष किशोर हातागळे तसेच निगडी प्रभागअध्यक्ष भरत थोरात यांनी केले.